अवकाळी पाऊस गारपीट यामुळे संत्रा लागवड उद्ध्वस्त..
वर्धा, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्धा जिल्ह्याच्या कारंजा (घाडगे) तालुक्यातील सेलगाव, चिंचोली भागाला अवकाळी पावसासह गारपीट, सेलगाव (उमाटे) येथे वादळामुळे संत्राची ४० झाडे उन्मळून पडल्याने जमीनदोस्त झाली तर चिंचोली येथे काकडी पिकाचे नुकसान झाले आहे.
वर्धा जिल्ह्याच्या कारंजा (घाडगे) तालुक्यातील सेलगाव, चिंचोली भागाला अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसला आहे. सेलगाव, चिंचोली परिसरात वादळ, अवकाळी पावसासह गारपिट झाली. सेलगाव (उमाटे) येथे वादळामुळं संत्राची ४० झाडं उन्मळून पडल्याने जमीनदोस्त झाली आहे. तर चिंचोली येथे काकडी पिकाचं नुकसान झालंय.
संत्राची झाडं उन्मळून पडल्याने व काकडी खराब झाल्याने शेतकर्याचं मोठं नुकसान झालंय कृषी विभागाकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. शेतकर्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.
ML/KA/SL
9 April 2023