सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, पावसाचा जोर कायम

सिंधुदुर्ग दि २२– उत्तर कर्नाटक गोवा किनाऱ्यावरील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती ओढवल्यास जिल्हा प्रशासन अलर्ट असल्याचं जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल सायंकाळपर्यंत अकरा घरांचं अंशतः नुकसान झाले आहे. आज सकाळी आंबोली घाटात दरड कोसळून हा मार्ग काही काळ बंद झाला होता . प्रशासनाने त्वरित हालचाल करत या ठिकाणची वाहतूक सुरळीत केली.