ऑपरेशन सिन्दुर यशस्वी झाल्याबद्दल शिवसैनिकांनी केला जल्लोश

अलीकडेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने “ऑपरेशन सिंदूर”च्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान आणि पी.ओ.के.मधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करुन हे अड्डे उध्वस्त केले आणि आपल्या मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा वचपा काढला. भारतीय सैन्याच्या या दमदार कामगिरीने देशभरात सर्वत्र अभिमानाचे आणि वीररसपूर्ण वातावरण आहे. सैन्याच्या या ऐतिहासिक कारवाईबद्दल दक्षिण मुंबई विभाग क्र. १३ मधील सर्व पुरुष व महिला पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी लालबाग येथील भारतमाता सिनेमा समोर आनंदोत्सव साजरा केला.
“हिंदुस्तान जिंदाबाद”, “भारत माता की जय”, “भारतीय सैन्याचा विजय असो” अशा घोषणा देत शिवसैनिकांनी भारतीय सैन्याचे आणि केंद्र सरकारचे अभिनंदन केले. तसेच भारतीय सैन्याच्या धाडसाला आणि कार्याला सलाम केला.
याप्रसंगी महिला विभागप्रमुख सौ. श्रद्धाताई हुले, वरळी विधानसभा प्रमुख श्री. दत्ता नरवणकर, सौ. रत्नाताई महाले, महिला विधानसभा संघटक सौ. अस्मिताताई ननावरे, शिवडी विधानसभा प्रमुख श्री. शशिकांत निकम, सौ. अनुराधाताई इनामदार, विधानसभा संघटक श्री. प्रकाश चाळके, सौ. आकांक्षाताई गावडे, तसेच वरळी शिवडी भायखळा विधानसभेतील सर्व पुरुष व महिला उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना, युवतीसेना पदाधिकारी, अन्य पदाधिकारी, शिवसैनिक आणि महिला आघाडी आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
KK/MS