महापालिकेच्या हद्दवाढीला विरोध, १८ गावांमध्ये बंद

 महापालिकेच्या हद्दवाढीला विरोध, १८ गावांमध्ये बंद

कोल्हापूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महापालिका हद्दवाढ माझ्या पद्धतीने करणार आहे, असे विधान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया आज उमटली. कोल्हापूर शहराभोवतीच्या संभाव्य हद्दवाढीतील १८ गावांमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. कोल्हापूर हद्दवाढीला विरोध असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.

कोल्हापूर महापालिका स्थापन झाल्यापासून गेल्या पन्नास वर्षांत अजिबात हद्द वाढ झाली नाही. याबाबत अनेक प्रस्ताव सादर होऊनही पुढे काहीच घडले नाही. आता जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ झाले आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर महापालिकेत आढावा बैठक घेतली. तेव्हा माझ्या पद्धतीने हद्दवाढ करणार आहे, असे विधान केले होते.

मुश्रीफ यांच्या या विधानाविरोधात ग्रामीण भागातून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला विरोध करीत आज १८ गावांमध्ये बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच ग्रामीण भागातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. अनेक गावांमध्ये सकाळी दुचाकी फेरी काढण्यात आली. Opposition to extension of municipal limits, shutdown in 18 villages

ML/KA/PGB
12 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *