वांद्रे-वर्सोवा कोस्टल ब्रिजला विरोध

 वांद्रे-वर्सोवा कोस्टल ब्रिजला विरोध

मुंबई दि.15 (एम एमसी न्यूज नेटवर्क): वांद्रे-वर्सोवा कोस्टल ब्रिज प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत जुहू येथील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी पर्यावरणपूरक समुद्राखालील बोगद्याचा पर्याय सुचवला आहे. ‘जुहू बीच वाचवा’ मोहिमेअंतर्गत आज मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत उम्मेद नाहाटा, डॉ. हिमांशू मेहता, श्रीमती उषाबेन पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

डॉ. हिमांशू मेहता यांनी यावेळी सांगितले, “हा प्रकल्प जुहू बीचच्या नैसर्गिक सौंदर्याला हानी पोहोचवेल आणि पर्यावरणीय समतोल ढासळेल. दररोज लाखो पर्यटक या बीचला भेट देतात. त्यामुळे कोस्टल ब्रिजऐवजी समुद्राखालील बोगदा हा अधिक योग्य आणि शाश्वत पर्याय आहे.”या प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी न्यायालयाने अधिक कागदपत्रांची मागणी केली होती, जी पूर्ण करून आता नव्याने याचिका सादर करण्यात आली आहे. या चळवळीला बळ देण्यासाठी सोशल मीडियावर जनजागृती, शांततामय रॅली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

चळवळीच्या माध्यमातून जुहू बीचचे सौंदर्य, पर्यावरणीय समतोल आणि दीर्घकालीन शाश्वतता यांचे रक्षण करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व भारतीय नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले, जेणेकरून मुंबईच्या किनारपट्टीचे वैभव आणि पर्यावरण अबाधित राहील.

जुहू बीचच्या नैसर्गिक सौंदर्याचे संरक्षण पर्यावरणीय समतोल राखण्याची गरज समुद्राखालील बोगदा हा शाश्वत पर्यायस्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या हितांचे रक्षण‘जुहू बीच वाचवा’ मोहीम पुढील काळातही विविध उपक्रमांद्वारे आपला आवाज बुलंद करत राहणार आहे.

SW/ML/SL
15 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *