लोकसभेत विरोधकांनी भिरकावले अमित शहांवर कागद

नवी दिल्ली. दि. 20 : आज लोकसभेमध्ये Criminal MPs bill वरील चर्चेच्या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात प्रचंड वादविवाद झाले. विधेयक सादर होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्यावर पाच वर्षांहून अधिक शिक्षेची तरतुदी करण्यात आली आणि ते 30 दिवसांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत राहिले, तर त्यांना पदाचा राजीनामा देणे अनिवार्य ठरणार आहे. विधेयक सादर होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. अनेक खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या दिशेने त्या विधेयकाची फाडलेली प्रत फेकली. एवढेच नव्हे तर कागदाचे तुकडे हवेत उडवून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली, यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला. काही सदस्यांनी अमित शहा यांनी लोकसभेत तीन विधेयके सादर केली तेव्हा विरोधकांनी त्यांच्या प्रती फाडल्या. त्यानंतर हे विधेयक जेपीसीकडे पाठवण्यात आले.
लोकसभेचे कामकाज सायंकाळी ५ वाजता पुन्हा सुरू झाले. सभागृहात केंद्रीय माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर लोकसभेने हे विधेयक मंजूर केले. यादरम्यान, विरोधी पक्षाच्या खासदारांनी एसआयआर मुद्द्यावर घोषणाबाजीही केली. विधेयक मंजूर झाल्यानंतर, लोकसभेचे कामकाज उद्या, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.