विरोधकांनी शेतकऱ्यांना वाहिली श्रद्धांजली, सभागृहात गदारोळ
नागपूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीवरील चर्चे दरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी भर सभागृहातच शेतकऱ्यांना दोन मिनिटे उभे राहून आदरांजली वाहिली, त्यावरून गदारोळ झाला आणि कामकाज तहकूब करावे लागले.
उबाठा गटाचे सदस्य अनिल परब यांनी सरकारवर सडकून टीका केली,सरकार आता मदत जाहीर करेल पण हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘ऑपरेशन सक्सेस, पेशंट इंज डेड’ असा आहे. शेतकरी मरतो आहे. अशा मरणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करतो असे ते म्हणाले त्यांच्या या वाक्यानंतर विरोधकही श्रद्धांजलीसाठी उभे ठाकले.
त्याला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सत्ताधाऱ्यांनी विरोध केला. हा खातेधारक 1 कोटी 57 लाख जिवंत शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहाला सांगितले. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. गोंधळातच सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
ML/KA/SL
12 Dec. 2023