नागपूर भूखंड प्रकरणी सरकारला खिंडीत गाठण्यात विरोधक अपयशी
नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूरात मुख्यमंत्र्यांनी वाटप केलेल्या भूखंडाबद्दल उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले त्याबाबतचा खुलासा सरकारने करावा अशी मागणी विधानसभेत झाली , विधान परिषदेत यावर प्रचंड गदारोळ करून कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात यशस्वी ठरलेले विरोधक विधानसभेत मात्र सपशेल अपयशी ठरली.
संपूर्ण समन्वयाचा अभाव असल्याने छगन भुजबळ यांनी सभागृहात ही माहिती उपस्थित करत खुलासा मागितला मात्र महाविकास आघाडी एकमेकांचे तोंड बघत बसल्याचे चित्र होते .सुरुवातीला हे सदस्य एकमेकांवर चांगलेच आक्रमक झाले, आशीष शेलार आणि सुनील प्रभू, रवींद्र वायकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली, स्वतः देवेंद्र फडणवीस जागा सोडून पुढे गेले आणि त्यांनी दोन्ही बाजूंना शांत केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना उत्तर देण्याचा प्रयत्न करताच मुख्यमंत्र्यानीच उत्तर द्यावे अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली, त्यावरून गोंधळ झाला . दोन्ही बाजूने शाब्दिक हल्ले सुरू राहिल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला होता .
नागपूर अभिन्यासातील चौतीस भूखंड यापूर्वीच नियमानुकुल करण्यात आले होते , पस्तीसावा हा भूखंड धारक गुंठेवारी की रेडी रेकनर नुसार या वादात अपिलात आपल्या कडे आला , आधीच्या भूखंडाला लावलेले नियम लावून त्यानुसार कारवाई करावी असा निकाल आपण दिला, आपण कोणताही अधिकार दुरुपयोग केला नाही , शासन नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले, २००१ च्या आधीपासून ही बांधकामे आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात स्पष्ट केले.
सदरचे प्रकरण या संदर्भात न्यायलयाने नेमलेल्या गिलानी समितीबाबत आपल्याला संबधित कोणीही माहिती दिली नव्हती, मात्र माझ्या लक्षात आल्यानंतर मी माझे आदेश रद्द केले आहेत, आता न्यायालयाच्या निर्णयावर त्यावर पुढील कारवाई होईल असेही शिंदे यांनी सभागृहात स्पष्ट केले.Opposition failed to bring the government to pass in the case of Nagpur plot
मुख्यमंत्र्यानी ही माहिती दिल्यावरही विरोधक चर्चेसाठी आग्रही , त्याला अध्यक्षांनी परवानगी नाकारली , मात्र पुढे काय करावे याबाबत त्यांच्यात समन्वयच दिसला नाही , काँग्रेस सदस्य काहीसे आक्रमक झाले, राष्ट्रवादी चे सदस्य शांत होते , अखेर विरोधकांनी सभात्याग केला दरम्यान विधेयकावर चर्चा सुरू झाली होती एकीकडे सभात्याग होत असताना दुसरीकडे मात्र ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांनी विधेयकावर चर्चा सुरू ठेवली असे चित्र सभागृहात होते.
ML/KA/PGB
20 Dec .2022