विरोधकांचा नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सर्वोच्च न्यायालयाने ज्याला गट नेता म्हणून नाकारलं ते अजूनही मुख्यमंत्री म्ह्णून आहेत ते कलंकित आहे. सरकार घटनाबाह्य आहे म्हणून आजच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय सर्व विरोधी पक्षाने घेतला आहे असे विधानरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
आज दानवे यांच्या विधान भवनातील दालनात झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात , अशोक चव्हाण , पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील, एकनाथ खडसे, शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते.Opponents boycott the tea party as usual
शेतकऱ्यांचे कांदा अनुदान गेल्या अधिवेशनात सांगितलं ते दिलं नाही कापसाला भाव नाही, त्याचा निर्णय घेतला नाही.
दुपटीने भाव देऊ NDRF च्या निकषानुसार भाव देणार सांगितलं पण काहीच मिळालं नाही असा आरोप दानवे यांनी यावेळी केला.
1250 शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. घटना बाह्य मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू पण ते अपयशी झाले. हे शेतकरी विरोधी सरकार आहे, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे.
नागपूर मध्ये गावठी कट्टे विकल्या जात आहे सरकार पुरस्कृत दंगली होत आहेत असेही आरोप अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केले.
सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचार आरोप झाले आहेत . मित्तल टॉवर मध्ये बसून व्हाट्स एप बदल्या झाल्या आहेत असा कृषी मंत्र्यांवर आरोप आहे. अनेक उद्योग धंदे गुजरात मध्ये गेले आहेत. ईडी च्या दाबावातून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात आले. समृद्धी महामार्गावर अपघात होत आहेत त्याचे काही केलं नाही, त्यात भ्रष्टाचार झाला सोयी सुविधा नाहीत.खारघर मध्ये महाराष्ट्र भूषण निरुपणकार यांचा कार्यक्रम झाला त्यात मृत्यू झाले जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाही झाली पाहिजे. त्याचा तपास झाला पाहिजे. महाराष्ट्राला कलंकित करण्याचं काम आजच सरकार करत आहेत अशी टीका दानवे यांनी यावेळी केली.
सगळे विरोधी पक्ष सोबत आहेत, एकसंघ आहेत आमच्या संख्येवर जाऊ नका असे सांगत त्यांनी
विरोधी पक्षनेता विधिमंडळात ठरेल असे स्पष्ट केले.
ML/KA/PGB
16 July 2023