बोरीवली राष्ट्रीय उद्यानात धावणार ओपन विंटेज टॉय ट्रेन
मुंबई, दि. 14 : मुंबईच्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दुसरी वन राणी विंटेज टॉय ट्रेन दाखल झाली आहे. येथील उद्यानात पहिली व्हिस्टाडोम टॉय ट्रेन सुरू असतानाच आता दुसरी विंटेज ओपन टॉय ट्रेन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये दाखल झाल्याने पर्यटकांसाठी ही गुडन्यूज आहे. वनराणी नावाने लोकप्रिय असलेल्या या ट्रेनची चाचणी धाव सुरू असून 2 ते 3 दिवसात ट्रेनची चाचणी पूर्ण होऊन लवकरात ही वनराणी मुंबईकरांच्या सेवेत धावणार आहे.
वनराणी पुन्हा एकदा लहानग्यांसह प्रौढांनाही भुरळ घालणारी ठरणार आहे, मागील 4 वर्षापासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये वन राणी टॉय ट्रेन बंद होती. मुंबई उत्तर मुंबईचे खासदार व केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या प्रयत्नांमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (SGNP) प्रसिद्ध ‘वन राणी’ टॉय ट्रेन पुन्हा एकदा सुरू होणार आहे. उद्यानातील एक प्रमुख आकर्षण असलेली ही टॉय ट्रेन प्रणाली नव्याने सुसज्ज करण्यात आली असून विशेषतः मुलांना आनंददायक व रोमांचकारी अनुभव देणार आहे.
नवीन दुसरी विंटेज टॉय ट्रेन जे की ओपन असल्यामुळे पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता येणार आहे, तर पहली व्हिस्टाडोम टॉय ट्रेन, जी पारदर्शक छप्पर व मोठ्या काचेच्या खिडक्यांसह आहे, ती अहमदाबादहून आली असून तिच्या चाचणी फेऱ्या पूर्ण झाली आहे.
उद्यानप्रेमी, निसर्गप्रेमी व लहान मुलांची ही जुनी मागणी आता पूर्ण होणार आहे, चाचणी फेऱ्या यशस्वी झाल्यानंतर लवकरच नियमित सेवा सुरू होणार असून पर्यटक आणि विशेषतः लहान मुलांना मुंबईच्या हरित परिसरात फेरफटका मारण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.
SL/ML/SL