लक्षवेधी सूचना उपस्थित करणारे सदस्यच गायब , सभागृहात गोंधळ

 लक्षवेधी सूचना उपस्थित करणारे सदस्यच गायब , सभागृहात गोंधळ

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लक्षवेधी सूचना उपस्थित करणारे सदस्यच ती विचारायला हजर राहत नाहीत त्यामुळे त्या सूचना रद्द करण्यात याव्यात अशी मागणी आज मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेच्या विशेष सत्रात करीत तीव्र नाराजी व्यक्त केली. मागच्या आठवड्यात ही अशाच पद्धतीने नाराजी व्यक्त करत त्यांनी हीच मागणी केली होती.

आज विशेष सत्रात नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या लक्ष वेधी ला ते स्वतःच अनुपस्थित होते त्यामुळे हा विषय पुन्हा उपस्थित झाला, बच्चू कडू आणि आशिष जयस्वाल यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त करत सामंत यांना पाठिंबा दिला.

ग्रामसडक योजनेसाठी वेगळे धोरण

मुख्यमंत्री ग्राम सडक आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती साठी सध्या असलेली दोन वर्षांची हमी पाच वर्षे करण्यासाठी आवश्यक धोरण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आखलं जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते, किरण लाम्हते, आशिष जयस्वाल आदींनी यावर प्रश्न उपस्थित केले होते. Only the members who presented the attention-grabbing suggestions disappeared, confusion in the hall

ML/KA/PGB
19 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *