नाफेड कडून जोरदार कांदा खरेदी सुरू
नाशिक, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर नाफेड ने कांदा खरेदी सुरू केली असून रात्री उशिरापर्यंत ती सुरू आहे. देवळा जवळच्या नाफेडच्या केंद्रावर कांदा खरेदी सुरू रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.
कांद्याच्या दरात झालेली मोठी घसरण आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसाने मुळे नाशिक जिल्ह्याचे प्रमुख पीक असणारे कांदा उत्पादक शेतकरी हैराण आणि संतप्त झालेल्या असताना केंद्र आणि राज्य शासनाने नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे .
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नाशिक सुरत रस्त्यावरील देवळा जवळच्या कुंटेवाडी येथील नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी संध्याकाळपासून कांदा विक्रीसाठी आणायला सुरुवात केली आहे खोटेवाडी जवळ नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू होत असल्याची माहिती या खरेदी केंद्राचे संचालक संस्था देवळा ऍग्रो फार्मर्स कंपनी यांनी शेतकऱ्यांमध्ये सामाजिक माध्यम आणि अन्य प्रसार माध्यमांद्वारे पसरल्यानंतर शेतकऱ्यांकडून याबद्दल अधिक माहिती घेण्यास सुरुवात झाली.
समाज माध्यमांद्वारे या प्रकारचा कांदा खरेदी होऊ शकेल किंवा काय तसेच त्याबाबतचे आवश्यक ती कागदपत्र आणि नियम याबाबत संबंधित संस्थेकडून नाफेड मार्फत शेतकऱ्यांना माहिती दिल्यानंतर आज संध्याकाळपासून शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावर कांदा विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली. अंधार पडल्यानंतर देखील या खरेदी केंद्रावर खरेदी केंद्राचे संचालक संजय तानाजी आहेर जितेंद्र गुंजाळ आणि अन्य कर्मचाऱ्यांनी केंद्रावरती येणाऱ्या शेतकऱ्यांचा कांदा अंधाराची परवा न करता मोबाईल आणि टॉर्च च्या प्रकाशात देखील खरेदी करण्यास सुरुवात केली असून कोणत्याही शेतकऱ्याला परत पाठविले जाणार नाही याची दक्षता घेत आहेत .Onion purchase started from Nafed
रात्री आठ वाजेपर्यंत चार ट्रॅक्टर मधून सुमारे सव्वाशे क्विंटल कांदा या केंद्रावर खरेदी करण्यात आला असून उद्या सकाळी नऊ वाजेनंतर मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी सुरू होईल मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा विक्रीसाठी उद्या या केंद्रावर घेऊन येतील असा विश्वास केंद्राच्या संचालकांनी व्यक्त केला आहे. आज कांद्याला 845 रुपये 75 पैसे क्विंटन याप्रमाणे भाव मिळाला असून कांदा खरेदीची पावती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
सातबाराचा उतारा आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुक वगैरे कागदपत्र शेतकऱ्यांना आणणे बंधनकारक असून जे शेतकरी या अटींची पूर्तता करतील त्यांनी प्रतवारी करून कांदा केंद्रावर आणावा असे आवाहन केंद्र संचालकांनी केले आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत कांदा खरेदी सुरू असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
ML/KA/PGB
2 Mar. 2023