या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आणि धान्याचे लिलाव बंद… 

 या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आणि धान्याचे लिलाव बंद… 

नाशिक दि ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती काल पासून शनिवार, 18 नोव्हेंबर पर्यंत दीपावली आणि साप्ताहिक सुट्ट्यानिमित्त तब्बल बारा दिवस कांदा लिलाव तर नऊ दिवस धान्य लिलाव बंद  ठेवण्याचा निर्णय लासलगाव बाजार समितीने जाहीर केला आहे.

लासलगाव मर्चन्टस् असोसिएशनने कांदा आणि धान्य विभागातील व्यापारी वर्गाचे पत्रानुसार काल 7 नोव्हेंबर ते शनिवार 18 नोव्हेंबर पर्यंत दिवाळी सणानिमित्त कांदा विभागातील व्यापारी वर्ग हे कांदा या शेतीमालाचे लिलावात सहभागी होणार नसल्याने आणि शुक्रवार 10 ते शनिवार 18 नोव्हेंबर अखेर धान्य विभागातील व्यापारी वर्ग हे धान्य या शेतीमालाचे लिलावात सहभागी होणार नसल्याने सदर कालावधीत लासलगांव मुख्य बाजार आवारावरील कांदा तसेच धान्य या शेतीमालाचे लिलाव बंद राहतील.

या काळात शेतकरी बांधवांनी आपली गैरसोय होऊ नये म्हणून वरील दिवशी कांदा आणि धान्य हा शेतीमाल विक्रीस आणू नये असे आवाहन लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले आहे .

SL/KA/SL

8 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *