सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मंजुरीसाठी आता एक खिडकी योजना

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देऊन त्याबाबतच्या प्रस्तावावर तीन महिन्यात प्रक्रिया होईल. त्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी आयोजित केलेल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत केली होती. त्यानुसार आज एक खिडकी योजनेस मंजुरीसाठीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
शासनाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाच्या योजनेतील सर्व परवानग्या या प्रस्ताव मिळाल्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.
स्वयंपुनर्विकासाच्या अनुषंगाने सर्व संबंधित नियोजन प्राधिकरणांनी कार्यवाही करून दिलेल्या मुदतीत एक खिडकी योजनेच्या माध्यमातून प्रस्ताव लवकरात लवकर निकाली काढावेत. One window scheme now for approval of co-operative housing societies
त्याचबरोबर राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी सहकार क्षेत्रातील शिखर बँक असलेल्या राज्य सहकारी बँकेला नोडल एजन्सी जाहीर करण्यात आले असून ही नोडल एजन्सी त्या त्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून काम पाहणार आहे. तसेच मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यासह मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राकरिता मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोडल एजन्सी म्हणून घोषित करण्यात आल्याचेही शासन आदेशात म्हटले आहे.
ML/KA/PGB
30 Aug 2023