गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धत

 गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धत

मुंबई दि.25 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : पालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सोवासाठी गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतून ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील गणेशोत्सव मंडळांसाठी १ ऑगस्ट पासून ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे गणेश मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस व मुंबई अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीसाठी वेगळे अर्ज करण्याची गरज नाही.

गणेश मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता यावे, यासाठी पालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर . १ ऑगस्ट पासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधे अंतर्गत नमूद केलेल्या लिंकवर १ ऑगस्टपासून १३ ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

याठिकाणी पोलीस, वाहतूक पोलिस तसेच अग्निशमन दलाच्या परवानगीचेही अर्ज असल्याने यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नसेल. सदर मंडपांसाठी मंडळांना परवानगीकरिता शुल्क भरणे आवश्यक नाही. मंडप परवानगी नि:शुल्क देण्यात येणार आहे. तथापि, एक हजार रुपये सुरक्षा अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. तसेच यावर्षीदेखील गणेश मंडळांना अर्जासोबत हमीपत्रही द्यावे लागणार आहे. या हमीपत्राचा नमूना संकेतस्थळावरून डाऊनलोड करून संबंधितांच्या स्वाक्षरीसह अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. श्री गणेश मंडळांना मंडप उभारणी परवानगीबाबत काही अडचण आल्यास आपापल्या विभागातील सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन पालिकेने केले आहे.

SW/KA/SL

25 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *