एक एक धागा विणला जातोय श्री रामासाठी

नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २२ जानेवारीला अयोध्या येथील श्रीराम मंदिर येथे प्राणप्रातिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण देशात राममय वातावरण तयार झाले असून काही संस्था, नागरिक आपआपल्या परीने या कार्यात योगदान देत आहेत.
नागपुरात देखील भारतीय जनता पक्ष विणकर आघाडीच्या वतीने एक एक धागा श्रीरामासाठी, भक्तीने विणूयात एक एक धागा अयोध्येतील श्रीरामासाठी, या म्हणी प्रमाणे विणकर आघाडीच्या वतीने हातमागावर प्रभू श्रीरामा साठी कापड तयार करण्यात येत आहे. दोन हातमागाच्या यंत्रावर हे हातांनी हे कापड तयार करण्यात येत आहे. हे कापड तयार करण्यासाठी अनेकांचे हात याला लागलेले आहे. सर्व धर्म समभाव या प्रमाणे कुणीही नागरिक कुठल्याही समाजाचा व्यक्ती या उपक्रमात हातभार लावीत आहे. युवक, युवती, महिला, पुरुष, या एक एक धागा विणण्यासाठी सरसावला आहे. एक हातमाग यंत्रावर 14 मीटर कापड तयार करण्यात येणार असून दोन हातमाग यंत्रावर 28 मीटर कापड तयार करण्यात येणार आहे.
यातील एक कापड नागपुरातील प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिर आणि दुसरे कापड अयोध्या येथे पाठविण्यात येणार आहे. जवळपास 3 ते 4 हजार नागरिकांनी यात आपला हातभार लावलेला आहे. One thread is being woven for Shri Rama
ML/KA/PGB
18 Jan 2024