महिलांसाठी गुडन्यूज! L&T कंपनीमध्ये मासिक पाळीदरम्यान एक दिवसाची Paid Leave

भारतात पहिल्यांदाच एल अँड टी या खासगी कंपनीने मासिक पाळीदरम्यान महिलांना महिन्यातून एक दिवस भरपगारी सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. एल अँड टीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यन यांनी पहिल्यांदाच कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला एक दिवस मासिक पाळीच्या पार्श्वभूमीवर रजा देण्याची सुविधा सुरू केली आहे. मुंबईतील पवई कार्यालयात महिला दिनाच्या कार्यक्रमात कंपनीनं ही घोषणा केली.महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक महिलांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पाळीच्या काळात महिलांना होणारा त्रास पाहता, कंपनीने उचललेले हे पाऊल भविष्यासाठी नक्कीच स्वागतार्ह आहे, असे अनेक महिलांचे म्हणणे आहे.