राज्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचे निधन
मंडणगड, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंडणगड तालुक्यातील पाले या गावातील कोरोना बाधित रुग्णाचे दापोली येथे निधन झाले. यामुळे कोकणामध्येही कोरेनाने छुप्या पावलाने प्रवेश केल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे अद्याप शांत असलेली स्थानिक आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
पाले येथील संबंधित रुग्णाला दम्याचा त्रास झाल्याने तपासणीसाठी रुग्णालयात आला होता. मात्र त्यांची लक्षणे पाहून संशय आल्याने डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात त्याची ऍंटीजेन चाचणी केली. त्यामध्ये तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी त्याला दापोली येते पाठवण्यात आले होते. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
येथील रुग्णालयात कोरोना उपचारासाठी आवश्यक व्यवस्था आहे, परंतु डॉक्टर पुरेशा संख्येने नसल्याने कोरोनाचे रुग्ण वाढल्यास गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. आरोग्य विभागाने याबाबत तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी येथील स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
SL/KA/SL
28 Dec. 2022