ताडोबा महोत्सवाच्या निमित्ताने वनवसाहत मैदानावर भारतमाता साकारली

चंद्रपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :1 मार्चपासून चंद्रपूर शहरातील चांदा क्लब मैदानावर ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर नेण्यासाठीचा ताडोबा महोत्सव सुरू आहे, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पर्यटनातून रोजगार अशी साखळी जोडत मानव अस्तित्वाशी घट्टपणे जोडण्याचा वनविभागाचा हा प्रयत्न आहे.
चंद्रपुरात ताडोबा महोत्सवाच्या निमित्ताने अनोखा गिनीज विश्वविक्रम झाला. शहरातील रामबाग वनवसाहत मैदानावर भारतमाता ही अक्षरे साकारली गेली. महाराष्ट्र वनविभागाच्या वतीने 23 देशी प्रजातीच्या 65 हजार 724 कुंडीतील रोपट्यांच्या सहाय्याने भारतमाता हे अक्षर साकारले गेले. 1 मार्चपासून चंद्रपूर शहरातील चांदा क्लब मैदानावर ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक पातळीवर नेण्यासाठीचा ताडोबा महोत्सव सुरू झालाय. याद्वारे ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पर्यटनातून रोजगार अशी साखळी जोडत मानव अस्तित्वाशी घट्टपणे जोडण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे.
ताडोबा पर्यावरणाचे ज्ञानवर्धन केंद्र व्हावे अशी संकल्पना असून हा विश्वविक्रम वनविभागाच्या भविष्यातील कामाला प्रेरणा देणारा उपक्रम असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतासाठी 2070 मध्ये शून्य कार्बन उत्सर्जन लक्ष्य ठेवले आहे. यात महाराष्ट्र वनविभाग देशात सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी या विश्वविक्रमाद्वारे व्यक्त केला. On the occasion of the Tadoba festival, Bharat Mata was performed at the forest plantation grounds.
ML/KA/PGB
2 March 2024