शिमगोत्सवानिमित्त ग्रामदेवतेच्या पालख्यांची गावभेट सुरू…
रत्नागिरी, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिमगोत्सव हा कोकणातील महत्वाचा सण आहे. तब्बल महिनाभर कोकणात शिमगोत्सव साजरा केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगोत्सवाची एक वेगळी ओळख आहे. परंपरेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावात शिमगा साजरा केला जातो. दरम्यान शिमगोत्सव आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवतेच्या पालखीची गावभेट सुरू झाली आहे.
यामध्ये ग्रामदेवतेची पालखी वाजत गाजत गावातील प्रत्येक घरात भेट देते. यावेळी प्रत्यक्ष देव दारात आल्याने ग्रामस्थ भाविक देखील यथाशक्ती त्याची सेवा तसेच पूजा अर्चा करतात. पुढे गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रामदेवतेच्या रंगपंचमीने शिमगोत्सवाची सांगता होते.
ML/ML/SL
31 March 2024