रमजान ईद निमित्त राज्यात ठिकठिकाणी नमाज पठण

 रमजान ईद निमित्त राज्यात ठिकठिकाणी नमाज पठण

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुस्लिम समाजात अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सांगता आज 22 एप्रिलला रमजान ईदने झाली. गेल्या महिन्याभरापासून मुस्लिम समाज बांधव रोजा (उपवास )पकडून अल्लाची उपासना, प्रार्थना करत होत रमजान महिन्याचा आजचा शेवटचा दिवस रमजान ईद ने राज्यात साजरा केला गेला.

ईद निमित्त मुस्लिम समाज बांधव राज्यभरातील ईदगाह मैदानावर सकाळी उपस्थित झाले, त्यानंतर मुस्लिम धर्मगुरू समवेत प्रार्थना करून सर्व मुस्लिम समाज बांधवांनी रमजान ईदची सामूहिक नमाज अदा केली.

त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी लहानांपासून तर थोरापर्यंत मुस्लिम समाज बांधव ईदगांवर सामूहिक नमाज अदा करण्यासाठी उपस्थित झाले होते.

SL/KA/SL

22 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *