संक्रांतीच्या तोंडावर गुळाला योग्य भावच नाही…
जालना दि १२– जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची आवक यंदा कमी असल्याचं चित्र असून संक्रांत तोंडावर आली तरी गुळाला योग्य भाव मिळत नसल्याने जालन्यातील गूळ व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केलीय. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या गुळाची आवक कमी असल्याचं चित्र दिसून येत आहे.
सध्या तीन ते चार हजार रुपये क्विंटलने गुळाची विक्री केली जात असून दररोज फक्त 2 ते 3 हजारची गुळाची आवक जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत होत आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस झाला आणि यावर्षी पावसाचा खंड पडला त्यामुळे दोन्ही वर्ष ऊसाचे नुकसान झाले. याचा फटका गूळ निर्मितीला बसला. त्यामुळे संक्रांत आली तरी यंदा गुळाची आवक बाजार समितीत कमी असल्याचं जालना येथील गूळ व्यावसायिकांनी म्हटलं आहे.