क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्र्यानी केले अभिवादन

 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्र्यानी केले अभिवादन

सातारा, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी येथील नूतनीकृत सभागृहाचे लोकार्पणही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.

यावेळी अन्न , नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, इतर मागास , बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महिला , बाल विकास मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार मकरंद पाटील, जयकुमार गोरे, महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहाचे लोकार्पण

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहाचे लोकार्पणही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. या सभागृहाच्या नूतनीकरणा
अंतर्गत स्थापत्य कामांसाठी आणि विद्युतीकरणासाठी प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे एकूण ३० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली. On January 14, Mahayuti will meet all over the state

ML/KA/PGB
3 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *