OMG 2 चा टिझर रिलिज, महादेवांच्या रुपात हा दिसला हा अभिनेता

 OMG 2 चा टिझर रिलिज, महादेवांच्या रुपात हा दिसला हा अभिनेता

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : OMG -2 या अक्षय कुमार, अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचा टीझर रिलीज आज रिलिज झाला आहे. या टीझर दमदार टिझरमध्ये अक्षय कुमार भगवान शंकराच्या रूपात लांब केस आणि कपाळावर भस्म लावलेला दिसत आहे. हा सुपरहिट चित्रपट OMG चा सिक्वेल आहे. ज्यात परेश रावल यांनी अभिनय केला होता. अक्षय कुमारच्या २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओ माय गॉड’ (OMG) चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. पहिल्या भागात अभिनेत्याने श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती आता दुसऱ्या भागात (OMG2) अक्षय कुमार भगवान शंकराच्या अवतारात दिसणार आहे.

‘ओ माय गॉड २’ या चित्रपटाचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन अमित राय यांनी केले आहे. पहिल्या भागात परेश रावल यांनी कांजीलाल मेहता हे नास्तिक पात्र साकारले होते. मात्र, दुसऱ्या भागात आस्तिक कांतीशरण मुतकल यांची कथा दाखवण्यात येणार आहे. अक्षय भगवान शंकराची, तर पंकज त्रिपाठी कांतीशरण यांची भूमिकेत दिसतील. पंकज त्रिपाठी या चित्रपटात आस्तिकाच्या भूमिकेत आहे.विशेष म्हणजे रामानंद सागर यांच्या रामायणात प्रभु रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल ‘OMG 2’ मध्ये रामचंद्राच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘

इन्स्टाग्रामवर टीझर व्हिडिओ शेअर करताना अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘रख विश्वास’. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी सनी दोओलचा ‘गदर 2’ चित्रपटही रिलिज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफीसवर दोन्ही चित्रपटांची जुगलबंदी पहायला मिळणार आहे.

SL/KA/SL

11 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *