OMG-2 येतोय या OTT प्लॅटफॉर्मवर

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या ‘OMG 2’ या चित्रपटाने एकट्या भारतात १७७. २९ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने २२१ कोटींचा टप्पा गाठला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने प्रचंड यश कमावल्यानंतर आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. ८ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट ११ ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अमित राय दिग्दर्शित चित्रपटाचं प्रेक्षकांकडूनच नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही आणि समीक्षकांनीही चित्रपटाचं विशेष कौतुक केलं. बॉक्स ऑफिसवर ‘OMG 2’ सोबत ‘गदर २’ सुद्धा प्रदर्शित झाला होता. ‘गदर २’ला थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असताना ‘OMG 2’ला ही देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
नुकतंच नेटफ्लिक्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही अधिकृत घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना सांगितले की, “आम्ही तुमच्यासाठी गुड न्यूज घेऊन आलो आहोत. ‘OMG 2’ ८ ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.” त्यामुळे ज्या प्रेक्षकांनी चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही, त्यांना आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर घरीच पाहता येणार आहे.
SL/KA/SL
4 Oct. 2023