ओम भूतकर साकारणार ऐतिहासिक प्रेमकथा
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुळशी पॅटर्न फेम डॅशिंग अभिनेता ओम भूतकर आता ‘रावरंभा’ या एका अलवार ऐतिहासिक प्रेम कथेच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. कसादार अभिनय आणि दमदार शब्दफेक अशा अफलातून मिश्रणातून ओमने आजवर केलेल्या मोजक्याच भूमिकांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्यामुळे त्याची ही ऐतिहासिक भूमिका पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत.
अभिनेत्री मोनालिसा बागल ही ओमची नायिका म्हणून झळकणार आहे. अनुप जगदाळे यांनी दिग्दर्शीत केलेला ‘रावरंभा’ हा चित्रपट शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी निर्मित केला आहे.
१२ मे रोजी रसिकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटासाठी गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी गीते लिहिली आहेत तर अमितराज यांनी स्वरसाज चढवला आहे. तर प्रताप गंगावणे यांनी चित्रपटाची कथा, पटकथा लिहिली आहे.
SL/KA/SL
15 March 2023