ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू 335 कोटींवर

 ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू 335 कोटींवर

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भालाफेकपटू नीरज चोप्रा हा देशातील अनेक युवकांचा आयकॉन आहे. तसेच यशाच्या शिखरावर असलेल्या नीरजला ब्रँण्ड ऍबॅसेडर नेमण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या उत्सुक आहेत. पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू 335 कोटी रुपये झाली आहे. त्याने भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला मागे टाकले आहे. पंड्याची ब्रँड व्हॅल्यू 318 कोटी रुपये आहे. नीरजच्या ब्रँड व्हॅल्यूसोबतच वार्षिक एंडोर्समेंट फी देखील वाढली आहे. नीरज बरोबरच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकणाऱ्या मनू आणि कुस्तीमध्ये 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेशच्या ॲन्डॉर्समेंट फीमध्येही वाढ झाली आहे. विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू 29 टक्क्यांनी वाढली आहे. तो भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी बनला आहे. त्याने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि रणवीर सिंग यांना मागे टाकले आहे.

नीरज चोप्राचे मूल्यांकन 248 कोटी रुपयांवरून 335 कोटी रुपये झाले आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या मते, नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू US$29.6 दशलक्ष (रु. 248 कोटी) वरून US$40 दशलक्ष (अंदाजे रु. 335 कोटी) पेक्षा जास्त झाली आहे. ऑलिम्पिकपूर्वी नीरजची ब्रँड व्हॅल्यू भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सारखीच होती, पण आता तो त्याच्याही पुढे गेला आहे. हार्दिक पांड्याची ब्रँड व्हॅल्यू सुमारे US$38 दशलक्ष (रु. 318 कोटी) आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये हार्दिक पाचव्या क्रमांकावर आहे.

नीरज चोप्राच्या एंडोर्समेंट फीमध्येही वाढ झाली आहे. त्याची एंडोर्समेंट फी वार्षिक प्रति डील 3 कोटींवरून 44.5 कोटी झाली आहे. याशिवाय, मनू भाकरची एंडोर्समेंट फी वार्षिक 25 लाख रुपये प्रति डीलवरून दीड कोटी रुपये झाली आहे. मनूने अलीकडेच शीतपेय विकणाऱ्या कंपनीसोबत दीड कोटी रुपयांचा ब्रँड एंडोर्समेंट करार केला आहे. त्याचप्रमाणे, विनेश फोगटची एंडोर्समेंट फी वार्षिक 25 लाख रुपयांवरून 75 लाख रुपये ते 1 कोटी रुपये झाली आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पॅकेज्ड फूड, आरोग्य, पोषण, दागिने, बँकिंग आणि शिक्षण यासारख्या श्रेणींमध्ये ब्रँडचा चेहरा बनवण्याची स्पर्धा आहे.

क्रोलच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्ट 2023 नुसार, विराटचे ब्रँड मूल्य $22.79 दशलक्ष (रु. 1904 कोटी) वर पोहोचले आहे. प्रायोजकत्वाच्या बाबतीत विराट कोहली आघाडीवर आहे. रणवीर सिंग दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू 20.31 दशलक्ष डॉलर्स (1703 कोटी रुपये) आहे. यानंतर शाहरुख खानने 12.07 दशलक्ष डॉलर (1012 कोटी रुपये) ब्रँड व्हॅल्यूसह तिसरे स्थान पटकावले आहे.

क्रोल सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्ट 2023 नुसार, क्रिकेटर्सच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये धोनी विराटच्या पुढे आहे. धोनीची ब्रँड व्हॅल्यू 95 मिलियन डॉलर (797 कोटी रुपये) आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानावर आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू 91 मिलियन डॉलर (763 कोटी रुपये) आहे. धोनी आणि सचिन यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनी अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. रोहित शर्मा $41 दशलक्ष (343 कोटी रुपये) च्या ब्रँड मूल्यासह चौथ्या स्थानावर आहे, तर हार्दिक पांड्या पाचव्या स्थानावर आहे.

ML/ML/SL

23 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *