Ola ने विकसित केले स्वदेशी Ola Map

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील आघाडीची कॅब कंपनी Ola (Ola Cabs) ने एक मोठा निर्णय घेतला असून Google Maps च्या सेवांना रामराम ठोकला आहे. Ola ने आता स्वतःचे स्वदेशी Map फिचर विकसित केले आहे. ओला समूहाचे अध्यक्ष भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, यामुळे वर्षाला कंपनीचे १०० कोटी रुपये वाचणार आहेत. ग्राहकांनी देखील ओला App अपडेट करून या Map सुविधाचा लाभ घ्यावा असे आवाहन अग्रवाल केले आहे.
ओलाचा दावा आहे की नवीन नेव्हिगेशन सेवेमुळे तुम्हाला Google Maps पेक्षा चांगला आणि अधिक विश्वासार्ह अनुभव मिळेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ओला मॅप्स सेवा भारतातील रहदारी आणि वेगाने बदलणाऱ्या मार्गांनुसार अपडेट होत राहील आणि त्यात सातत्याने बदल केले जातील. सध्या, ओला मॅप्सचा प्रवेश ओला इलेक्ट्रिक स्कूटर आणि ओला कॅब ॲप्समध्ये दिला जात आहे आणि कंपनी इतर ॲप्सचा देखील भाग बनवण्याचा प्रयत्न करेल.
नवीन सेवेमध्ये उपलब्ध असलेल्या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे AI-आधारित अल्गोरिदम व्यतिरिक्त, लाखो वाहनांचा रिअल-टाइम डेटा ओला मॅप्समध्ये एकत्रित केला जाईल. याशिवाय, खुल्या रस्त्यांचे नकाशे वापरण्याचा आणि योगदान देण्याचा पर्याय देखील आहे. कंपनी पुढील काही महिन्यांत आणखी फीचर्सचा एक भाग बनवणार असून या माध्यमातून ती गुगल मॅपशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करणार आहे.
SL/ML/SL
8 July 2024