श्री शिवाजी मंदिरात आता या मान्यवरांची तैलचित्रे

 श्री शिवाजी मंदिरात आता या मान्यवरांची तैलचित्रे

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘भारतरत्न’ लता मंगेशकर ह्या सर्वश्रेष्ठ गायिका होत्या तशा नाट्यरसिकही होत्या. त्यांनी तरुणपणी नाटकात कामही केले आहे. नाटक पाहण्याच्या आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने लता मंगेशकर अनेकदा दादर येथील’श्री शिवाजी मंदिर’ नाट्यगृहात
आल्या आहेत. त्याची आठवण जागती राहावी, यासाठी ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ट्रस्ट’च्या नियामक मंडळाने नाट्यगृहाच्या इमारतीत मुख्य जागी लता मंगेशकर यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार या तसबीरीचे अनावरण ज्येष्ठ गायिका उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते गुरुवार, २२ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता ‘श्री शिवाजी मंदिर’ नाट्यगृहात होणाऱ्या ‘मराठी नाट्य व्यावसायिक संघ’च्या ५४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात होत आहे. लता मंगेशकर यांचे तैलचित्र ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कदम यांनी चितारले आहे.

याचवेळी नटश्रेष्ठ गोपिनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधी च्या सहयोगाने ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या तैलचित्रचे अनावरण त्यांचे भाचे जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते होणार आहे.गोपीनाथ सावकार यांचे तैलचित्र चित्रकार विश्वास महाशब्दे यांनी चितारले आहे.Oil paintings of these dignitaries are now in the Shri Shivaji Temple

यानंतर ‘श्री शिवाजी मंदिर ट्रस्ट’ यांच्या सहयोगाने ‘मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ’ मुंबई ह्या संस्थेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘नाट्यमल्हार’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. ह्या आनंद सोहळ्याला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ट्रस्ट’चे सरचिटणीस अण्णासाहेब सावंत यांनी केले आहे.

ML/KA/PGB
21 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *