बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधिमंडळात
नागपूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधान भवन , मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात बसविले जाणार असून त्याचा अनावरण सोहळा ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारी, २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
यासंदर्भातील घोषणा विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी विधानसभेत केली . सर्व सदस्यांनी या संस्मरणीय सोहळ्यास उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हावे, अशी विनंती नार्वेकर यांनी यावेळी केली .
ऑगस्ट २०२२ च्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे तैलचित्र बसविण्याबाबत निवेदन अध्यक्षांना केले होते. त्यानुषंगाने याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात येईल असे अध्यक्षांनी आश्वासित केले होते. त्यानुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे समारंभपूर्वक झळकणार आहे.
ML/KA/SL
27 Dec. 2022