अरे देवा! चीनमध्ये पुन्हा नवा व्हायरस; सरकारकडून मास्क वापरण्याचं आवाहन
चीनमध्ये पुन्हा एका नवीन व्हायरसने डोकेदुखी वाढवली आहे. कोरोनानंतर आता कुठे जग सावरतंय, त्यात ह्युमन मेटाप्युमो व्हायरसने चीनमध्ये थैमान घातलं आहे. यामुळे चीनमधील श्वसन तज्ज्ञ आणि रोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी नागरिकांना फेस मास्क घालण्याची, हात वारंवार धुण्याची आणि सामाजिक अंतर पाळण्याची शिफारस केली आहे. पाच वर्षांपूर्वी चीनमुळे जगावर कोरोनाचं संकट आलं होतं. आता हे नवे संकट जगासाठीही धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या चीनमध्ये चार विषाणूंचा संसर्ग फोफावला असून, इथं एचएमपीव्ही म्हणजेच माइकोप्लाज्मा निमोनिया अतिशय झपाट्यानं पसरत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही चिंतेत आल्या आहेत. या विषाणूची एकंदर रचना कोरोनाच्या विषाणूप्रमाणंच असून तो हवेमार्फत संक्रमित होत असल्याचं सांगण्यात येत आहे.