साईभक्ताने केला साठ ग्रॅमचा हार साईबाबांना अर्पण
अहिल्यानगर दि १४ : बीड जिल्ह्यातील कोठारबन येथील साईभक्त धनराज रावसाहेब मुंडे यांनी आज ५९ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा हार शिर्डी येथील श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द केला. या सुवर्ण हाराची किंमत ०८ लाख ४२ हजार ५२० रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला . श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.