लग्नातील वरातीत आक्षेपार्ह गाणं वाजविल्याने दोन गटात वाद, दगडफेक..

बुलडाणा, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चिखली शहरातील एका लग्न वरातीमध्ये काल सायंकाळी आक्षेपार्ह गाणे वाजवण्यावरून झालेल्या वादानंतर तणाव निवळत असतानाच काही लोकांनी पुन्हा आक्षेपार्ह नारे दिल्याने वातावरण चिघळले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला ..
यात अनेक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ..
बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली शहरातील सैलानी नगर परिसरात काल सायंकाळी एका लग्नाची वरात निघालेली होती .. मात्र या वरातीत आक्षेपार्ह गाणे वाजवण्याच्या कारणावरून काही हुल्लड मुलांच्या दोन गटात वाद झाला होता … यावेळी पोलिसांच्या आणि प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्थिने वाद मिटल्यावर रात्री पुन्हा दोन्ही गटात चांगलाच वाद पेटून दोन्ही गटाकडून दगडफेक झाली ..
पोलिसांना हा जमाव पांगवण्यासाठी तत्काळ पोलिसांची जादा कुमक बोलाविली आणि त्यांच्यावर लाठीचार्ज सुद्धा यावेळी करावा लागला , आणि परिस्थिती नियंत्रण मध्ये आणायचा प्रयत्न केला .. या लाठीचार्ज मध्ये अनेक जण जखमी झाले असून उपचार घेत आहेत .. या प्रकरणी चिखली पोलीस स्टेशनला दोन्ही गटातील लोकांवर कलम 160 भादवीसह कलम 135, 143,147, 148, 149, 324, 337, 341 ipc महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे 31 जणासह इतर 25 जनावर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे ..
यातील पाच आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली असून सध्या सैलानी नगर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे . तर पोलिस सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली आहे ..offensive song being played during the wedding ceremony.
ML/KA/PGB
18 May 2023