BMC निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती

 BMC निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती

मुंबई, दि. ३१ : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल यांची मुख्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १९८९ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले इक्बाल सिंग चहल यांनी मे २०२० पासून जवळपास चार वर्षे मुंबई महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.

ही निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता लक्षात घेऊन तीन अतिरिक्त जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारीही अतिरिक्त निरीक्षक म्हणून नेमण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील उर्वरित २८ महानगरपालिकांसाठीही आयएएस अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाण्यात एमआयडीसी (MIDC) चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू, कल्याण-डोंबिवलीमध्ये एमआयडीसी (MIDC) संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंताडा राजा दयानिधी, मीरा-भाईंदर येथे कौशल्य विकास आयुक्त अमित सैनी, उल्हासनगर शहरात एमटीडीसी (MTDC) व्यवस्थापकीय संचालक निलेश गाटणे तर भिवंडी-निजामपूर येथे आदिवासी विकास महामंडळाचे अतिरिक्त आयुक्त गोपीचंद कदम यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *