ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि १५
अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाच्या वतीने मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट येथे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले. त्यास ओबीसी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष रवि बावकर यांनी मुंबईच्या जिल्हाधिकारी आँचल गोयल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कुणबी ओबीसी बंधू , भगिनी, युवक, युवती सक्रीय कार्यकर्ते यांनी मराठा समाजाच्या ओबीसी मध्ये होत असलेल्या घुसखोरी विरुद्ध जोरदार घोषणा देण्यात आल्या. ओबीसीचां हक्क अबाधित राखण्यासाठी तसेच आमचे हक्काचे आरक्षण वाचविण्यासाठी फोर्ट परिसरातील मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घोषणा देऊन आक्रोश व्यक्त करण्यात आला.आज संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नियोजन अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ,कुणबी समाजोन्नती संघ, वरळी शाखा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी सचिव संतोष जोगले, नवी मुंबईचे उपमहापौर अविनाश लाड,एडव्होकेट सुभाष बाणे, समाज नेते रवींद्र मटकर, प्रकाश भुवड अरविंद डाफले ,महेंद्र टिंगरे,पदाधिकारी संतोष चौगुले, शशिकांत रामाने,मोहन पळसमकर,रमेश जानस्कर व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS