ओबीसी आरक्षण प्रश्र्नी मुंबईत आज संध्याकाळी चर्चा
जालना, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वडोगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आज सरकरच्या शिष्टमंडळाने भेट घेत बऱ्याच वेळ चर्चा केली.या चर्चेनंतर आज संध्याकाळी मुंबईत याविषयार तातडीने चर्चा करून मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला, या चर्चेत वरिष्ठ ओबीसी नेते आणि आंदोलनकर्ते कार्यकर्ते यांचा समावेश असेल.
आज भेट घेतलेल्या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आ गोपीचंद पडळकर यांचा समवेश होता. या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री,उपुख्यमंत्री यांच्याशी फोनवरून चर्चा करून आज संध्याकाळी 5 वाजता मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहवर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे आता ओबीसी समाजाचे शिष्टमंडळ मुंबई कडे रवाना होत आहे. मुंबई इथे होणाऱ्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ,गोपीचंद पडळकर,विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार,पंकजा मुंडे यांच्यासह ओबीसी नेते सहभागी असणार आहेत.
ML/ML/SL
21 June 2024