विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा २८ जुलै रोजी शपथविधी

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत नवनिर्वाचित झालेल्या अकरा सदस्यांचा २८ जुलै रोजी शपथविधी आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणार आहेत.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले. यावेळी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून शपथ दिली जाणार आहे.
यामध्ये योगेश टिळेकर, पंकजा मुंडे ,परिणय फुके, अमित गोरखे ,सदाभाऊ खोत , भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
विधानभवनातील सेंट्रल हॉल मध्ये रविवार दि. २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
ML/ML/SL
25 July 2024