झोपडीधारकांची आझाद मैदानात ” न्याय दो पदयात्रा “

 झोपडीधारकांची आझाद मैदानात ” न्याय दो पदयात्रा “


मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या ५० वर्षापासून मुंबई सेंट्रल ते विरार रेल्वे लगत राहत असलेल्या झोपड्यांचे कायम स्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश झोपडीधारकांच्या बाजूने असतानाही त्यांना बेघर करण्यात येत आहे. वीज पाणी तोडली जात आहे. सरकारच्या व रेल्वे प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या वतीने आज (गुरुवार)
आझाद मैदानात ” न्याय दो पदयात्रा ” काढण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने २०२१ साली व मुंबई उच्च न्यायालयाने २०२३ साली रेल्वे व राज्य सरकारला आदेश दिले होते की , या रेल्वे लगत च्या झोपडीधारकांचे अगोदर पुनर्वसन करावे व नंतर विकास करावा. मात्र सरकार व रेल्वे प्रशासन नियम न मानता दडपशाही करून घर उध्वस्त करीत .
झोपड्या तोडल्याने झोपडीधारक उघड्यावर राहत आहेत. त्यांची लाईट,पाणी व भोजनाची व्यवस्था नसल्याने ती करावी,आर्थिक मोबदला मिळावा तसेच त्वरित पुनर्वसनाची जबाबदारी घ्यावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत. वन विभागामध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे लवकरात लवकर पुनर्वसनासाठी योजना तयार करण्यात यावी. अशी मागणी भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल लोंढे यांनी केली.

ML/KA/PGB 22 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *