पौष्टिक मिक्स सलाड

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
ब्रोकोली ( ५००-७५० ग्रॅम)
मशरुम ( १ पाकिट
बेबी कॉर्न ( १०० ग्रॅम)
स्वीट कॉर्न ( १०० ग्रॅम)
Bell Pepper ( १ मध्यम आकाराचे)
पनीर (२५० ग्रॅम)
ईतरः- ऑलिव्ह ऑईल, बटर, चिली फ्लेक्स, काळे मिरे पावडर, लसुण, मीठ`
क्रमवार पाककृती:
ब्रोकोली निवडून घ्या.
मशरुम, बेबी कॉर्न, पनीर, Bell Pepper धुवून कापून घ्या.
स्वीट कॉर्न धुवून घ्या.
ऑलिव्ह ऑईल गरम करुन त्यात लसुण आणि चिली फ्लेक्स परतून घ्या. सर्वात आधी ब्रोकोली आणि मशरुम टाका, परतून घ्या. नंतर बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न, मीठ टाकून मिक्स करुन घ्या. झकण ठेवून वाफेवर शिजू द्या. एक दोन वेळा हलवून घ्या. मशरुम शिजत आले की मिरे पावडर व Bell pepper टाका.
मशरुम शिजले की आपले काम झाले. पनीर बटर मधे परतून घ्या, बाकी घटकांसोबत मिक्स करा.
सलाड रेडी..
Nutritious mix salad
ML/ML/PGB
2 July 2024