नर्सरी आता होणार डिजिटल

 नर्सरी आता होणार डिजिटल

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक शहरातील व्यावसायिक नर्सरी आता डिजिटल होणार असून, आपले पर्यावरण संस्था नर्सरीला मोफत झाडांची माहिती देणारा क्यूआर कोड देणार आहे. या माध्यमातून ऑक्सिजन देणारी झाडे कोणती, झाडांचे आयुर्वेदिक महत्त्वासह झाडांचे विविध उपयोग किंवा कोड स्कॅन करून नागरिकांना समजणार आहे. यातून नागरिकांना निसर्ग शिक्षण मिळणार असल्याची माहिती आपले पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

सध्या नर्सरीमध्ये अनेक झाडे विकायला आहेत. नाशिक हे झाडांचे शहर म्हणून ओळखले जात आहे. पावसाळ्यात नागरिकांचा ओढा नर्सरीकडे वाढला आहे. एका नर्सरीमध्ये किमान ५०० ते १००० प्रकारची झाडे असतात. मात्र या झाडांची माहिती देण्यासाठी व्यक्ती उपलब्ध नसतात. अनेक वेळा नागरिकांना झाडांची माहिती अपूर्ण मिळते. देशी- विदेशी झाडे कोणती, झाडांचे पर्यावरणीय महत्त्व काय, ऑक्सिजन देणारी झाडे कोणती, कोणती झाडे कोणत्या प्रदेशात येऊ शकतात, झाडांना खत कोणते टाकावे, निगा कशी राखावी, पाणी कशाप्रकारे द्यावे, कोणत्या ऋतूमध्ये झाडांना फळ, फूल येते ही माहिती नागरिकांना आता नर्सरीमध्ये गेल्यावर झाडावर लावलेला क्यूआरकोड स्कॅन केल्यावर मिळणार आहे

PGB/ML/PGB
1 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *