भाजप प्रदेश कार्यालयात मंत्री नितेश राणे यांचा 2 जून रोजी जनता दरबार

मुंबई दि २९– राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या जनता दरबाराचे आयोजन प्रदेश भाजपा कार्यालयात करण्यात आले आहे. भाजपचे पक्ष संघटन व शासकीय कामकाज मुख्य समन्वयक सुधीर देऊळगावकर यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा जनता दरबार सोमवार 2 जून रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत नरिमन पॉईंट भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आला असल्याचे कळवले आहे. यावेळी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मंत्री महोदयांना द्यावयाची निवेदने लेखी स्वरूपात आणावीत असे आवाहन करण्यात आले आहे. ML.MS