एनटीसी मिल कामगारांची देणी आणि पगार न दिल्यास काम बंद आंदोलन, रामिम संघाचा आंदोलनात इशारा!
मुंबई, दि २४: एनटीसी मिल कामगारांचे डिसेंबर अखेर पर्यंत ग्रॅच्युईटी आदी न्याय्य देण्यासह थकीत पगार न दिल्यास काम बंदचे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष सुनील बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे यांनी व्यवस्थाप नाशी चर्चा करताना दिला आहे.
मुंबईतील एनटीसीच्या चार गिरण्यातील कामगारांना गेल्या १० महिन्याचा पगार दिलेला नाही.संघाने न्यायालयात धाव घेतली, न्यायालयानेही पगार देण्याचा आदेश दिला होता.त्या आदेशाचेही पालन केलेले नाही. व्यावस्थापनानेही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही.त्यामुळे उपाशीपोटी जीवन जगणाऱ्या कामगारांमध्ये असंतोष पसरला होता.या प्रश्नावर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आंदोलनाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार मुंबईतील एटीसी गिरण्यातील कामगारांनी आज बेलार्डपिअर येथील एनटीसीच्या प्रधान कार्यालयात घेराव आंदोलन छेडले.
दरम्यान रा.मि.म.संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष सुनील बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे या शिष्टमंडळाने एन. टी.सी.चे कार्यकारी अधिकारी कुमकुमा राजू यांची भेट घेतली आणि कामगारांच्या व्यथा मांडल्या. शिष्टमंडळाने येत्या महिना अखेरपर्यंत किमान दोन महिन्याचा थकीत पगार देण्यात यावा.पुढील महिन्याभरात टीडीआर,तयार मालाची विक्री करून किंवा अन्य मार्गाने निधी गोळा करून, कामगारांचा थकीत पगार आणि अन्य देणी देण्याची अट टाकली आहे.एनटीसी व्यवस्थापनाने संघाच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या मागण्या पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाईल,असे आश्वासन आज रा मि.म.संघ शिष्टमंडळा दिले आहे.
पण ते आश्वासन पूर्ण केले गेले नाही तर १ जानेवारी पासून चारी गिरण्यातील अत्यावश्यक सेवा खंडित करण्यात येऊन,या गिरण्यात कामबंदचे आंदोलन केले जाईल,असा खणखणीत इशारा दिल्यानंतर आजचे कामगारांचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले आहेत.KK/ML/MS