पुदिना चटणी-बटाटा पराठा आजच बनवून पहा

 पुदिना चटणी-बटाटा पराठा आजच बनवून पहा

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुदिना चटणी आपली नेहमीचीच भेळेसाठीची: एक वाटी पुदिना पाने फ्रेश, एक वाटी कोथिंबीर निवडून, हिरव्या मिरच्या तिखटवाल्या डार्क कलरच्या तीन, लसूण पाकळ्या सोलून चार, मीठ चवीनुसार, जिरे एक छोटा चमचा.

एक मध्यम आकाराचा बटाटा.

परोठ्या साठी मैदा किंवा गव्हाची कणीक.

तीळ , कलुंजी, जिरे, ओवा मिक्ष्स एक चमचा.

मिक्स चीज पाकीट बिग बास्केट वर मिळते ते ऐच्छिक आहे.

तेल/ तूप परोठा भाजायला.

क्रमवार पाककृती: 

पुदिन्याची चटणी अगदी अंगाबरोबर पाणी घालून वाटून घ्यावी. मिक्सर किंवा पाटा – वरवंटा काहीही वापरले तरी चालेल. फार फार पातळ चटणी करू नका.

बटाटा साले काढून किसून घ्या.

आता परातीत दोन वाट्या कणीक किंवा मैदा घ्या त्यात चटणी घाला व किसलेला बटाटा घाला. एकदा पाण्यातून काढून घातला तरी चालेल. मी तसाच घातलेला.

हे सर्व मिसळून मळून घ्या. जास्तीचे पाणी लागले तरच घाला . मळून झाले की तेलाचा हात लावुन परत एकदा मळा आता आपला परोठा डो तयार झाला.

आता तवा गरम करून मध्यम आचेवर आधी तेल घालून आपण रोजच्या घडीच्या पोळ्या करतो तसे पराठे लाटून भाजून घ्या.

अमूल बटर व केचप बरोबर सर्व्ह करा.

NTPC Recruitment for 223 Assistant Executive Posts

ML/KA/PGB
28 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *