NPPA ने या औषधांच्या किमतीत केली कपात

मुंबई, दि. ४ : नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग अथॉरिटी (एनपीपीए) ने आघाडीच्या औषध कंपन्यांकडून विकल्या जाणाऱ्या ३५ गरजेच्या औषधांच्या किंमतीत कपात केली आहे. यामध्ये हृदयरोगापासून मधूमेहापर्यंतची महत्त्वाची औषधे समाविष्ट आहेत. केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाने एनपीपीएच्या किंमत नियमनाच्या आधारे हा आदेश अधिसूचित केला आहे. अधिकृत आदेशानुसार सर्व किरकोळ विक्रेते आणि डीलर्सनी सुधारित दरयादी ठळकपणे ठळकपणे लावणे बंधनकारक आहे, जेणेकरून ग्राहकांना ती दिसेल
रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एनपीपीए ही देशातील औषधांच्या किमती निश्चित करणारी आणि त्यांचे निरीक्षण करणारी मुख्य संस्था आहे. एसिक्लोफेनॅक-पॅरासिटामोल-ट्रिप्सिन किमोट्रिप्सिन, अमोक्सिसिलिन आणि पोटॅशियम क्लॅव्हुलेनेट, एटोरवास्टॅटिन कॉम्बिनेशन आणि एम्पाग्लिफ्लोझिन सारखे नवीन ओरल एंटी-डायबिटिक कॉम्बिनेशन, सिटाग्लिप्टिन आणि मेटफॉर्मिन, यांसह आणि अन्य औषधे स्वस्त झाली आहेत.
डॉ. रेड्डीज लॅब्सने बाजारात आणलेली एसिक्लोफेनाक-पॅरासिटामोल-ट्रिप्सिन किमोट्रिप्सिन टॅब्लेट आता १३ रुपयांना उपलब्ध असेल, तर कॅडिला फार्मास्युटिकल्सची तीच टॅब्लेट १५.०१ रुपयांना उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या अॅटोरवास्टॅटिन ४० मिलीग्राम आणि क्लोपीडोग्रेल ७५ मिलीग्राम असलेल्या टॅब्लेटची किंमत आता २५.६१ रुपये झाली आहे. बालरोग वापरासाठी तोंडावाटे दिले जाणारे – सेफिक्सिम आणि पॅरासिटामोल कॉम्बिनेशनची किंमतही कमी झाली आहे. तसेच, व्हिटॅमिन डीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कोलेकॅल्सीफेरॉल ड्रॉप्स आणि वेदना व सूज यासाठी डायक्लोफेनाक इंजेक्शन (प्रति मिली ३१.७७ रुपये) सारख्या महत्त्वाच्या औषधांचाही समावेश आहे.
SL/ML/SL