या औषधांच्या किंमती वाढवण्यास NPPA ची मंजुरी

 या औषधांच्या किंमती वाढवण्यास NPPA ची मंजुरी

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या सुविधांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यातच आता दमा, क्षयरोग, मानसिक आरोग्याच्या औषधांच्या किंमतीत वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे. औषधांच्या किंमतीत वाढ होण्यामागचं कारण म्हणजे या औषध निर्मितीसाठी लागणारा खर्च वाढल्याचं औषध कंपन्यांचं म्हणणं आहे. याबरोबरच औषधासाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे औषधांच्या निर्मितीसाठी लागणारा खर्च वाढल्याचं औषध कंपन्यांनी सांगितलं आहे. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण म्हणजे नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग अथॉरिटीने ११ फॉर्म्युलेशनच्या किमतीमध्ये ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यास मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने दमा, क्षयरोग आणि मानसिक आरोग्य यासारख्या आजारांवरील औषधांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला.

बेंजाइल पेनिसिलिन १० लाख आययू इंजेक्शन, रेस्पिरेटर सोल्युशन ५ एमजी, पिलोकार्पाइन २ पर्सेंट ड्रॉप, सेफॅड्रोक्सिल ५०० एमजी, एट्रोपिन इंजेक्शन ०६.एमजी, इंजेक्शनसाठी स्ट्रेप्टोमायसिन पावडर ७५० मिग्रॅ आणि १००० मिग्रॅ (क्षयरोग आणि इतर जिवाणू संसर्गावर उपचार करण्यासाठी) साल्बुटामोल टॅब्लेट २ मिग्रॅ आणि ४ मिग्रॅ आणि रेस्पिरेटर सोल्यूशन ५ मिग्रॅ/मिली (दमा आणि इतर श्वसन रोगांवर उपचार करण्यासाठी), इंजेक्शनसाठी डेस्फेरिओक्सामाइन ५०० मिग्रॅ (ॲनिमिया आणि थॅलेसेमियावर उपचार करण्यासाठी) लिथियम गोळ्या ३०० मिग्रॅ (मानसिक आरोग्य उपचारांसाठी वापरल्या जातात).

SL/ML/S

15 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *