मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आता ‘आभासी कुंपण इशारा यंत्रणा’ …

 मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आता ‘आभासी कुंपण इशारा यंत्रणा’ …

चंद्रपूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या वनव्याप्त क्षेत्राच्या आसपास असणाऱ्या गावांना वन्यजीवांच्या हल्ल्याचा सतत धोका असतो. राज्यभर याबाबत गंभीर स्थिती आहे. यावर उपाय म्हणून राज्याच्या वनविभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावर आधारित नवा प्रयोग चंद्रपूरच्या सिताराम पेठ गावात आणि अन्य 12 गावांमध्ये सुरू केला आहे. गेल्या वर्षभरात हा प्रयोग माफक यशस्वी झाल्याने मानव -वन्यजीव संघर्ष टाळण्यास मोठी मदत झाली आहे.

 AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या कामी महत्त्वाचे साधन ठरू पाहत आहे. राज्यातील विविध भागात वनव्याप्त क्षेत्राच्या आसपास वसलेल्या गावांना वन्यजीव हल्ल्याचा सतत धोका असतो. यामुळे या गावातील पारंपरिक आणि शेतीकामे देखील प्रभावित झाली आहेत. प्रसंगी अगदी अंगणात येऊन मुले तसेच महिलांवर हल्ला करण्याइतपत वाघ , बिबटे यांचा वावर दिसू लागला आहे. गेल्या काही वर्षात उत्तम संवर्धनामुळे राज्यात वाघांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे.

अशा स्थितीत वाघांचा मानववस्तीकडे वावर सहाजिक वाढला आहे. यावर उपाय म्हणून वनविभागाने ए आय आधारित इशारा यंत्रणेची उभारणी केली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सितारामपेठ गावात ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर गावाच्या दिशेने येणारे वन्यजीव त्यांचे फोटो प्राप्त होत मोबाइल मध्य मोठा अलार्म येतो अलर्ट आल्या नंतर वन विभागाच्या टीम गावात सर्वांना अलर्ट करण्याचे काम करतात या माध्यमातून ग्रामस्थ सतर्क होत स्वतःचा बचाव करू शकत आहेत.

ही संपूर्ण यंत्रणा खर्चिक आहे. क्लाऊड आधारित यंत्रणा असल्याने अचूक असली तरी त्याचा देखभालीचा खर्चही मोठा आहे. मात्र पहिल्याच प्रयत्नात समाधानकारक यश मिळाल्याने अधिकारी देखील उत्साहित आहेत. या पुढच्या काळात सर्वाधिक मानव- वन्यजीव संघर्षग्रस्त गावांना प्राधान्याने अशी यंत्रणा उभारण्याची योजना दृष्टीपथात आहे. या यंत्रणेच्या उभारणीमुळे व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनावरचा ताण कमी होणार आहे.

वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अथवा जखमी झालेल्या ग्रामस्थाला शासन 25 लाख रु.नुकसान भरपाई स्वरूपात देते. अशा स्थितीत आर्टिफिशल इंटेलिजन्स यंत्रणा उभारणे म्हणजे एक प्रकारची गुंतवणूक समजली जात आहे. घटनेनंतर उपचारापेक्षा खबरदारी घ्यावी हे नक्की. AI यंत्रणेची ही गुंतवणूक पुढच्या काळात वनव्याप्त क्षेत्रातील ग्रामस्थांचा जीव वाचविण्याच्या कामी येणार आहे.

Now ‘virtual fence warning system’ to prevent human wildlife conflict…

ML/KA/PGB
25 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *