उंधियु

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिन्नस:
१२५ ग्रॅम गुलाबी सुरण.
१ लहान कंद.
२ रताळी.
२ कच्ची केळी.
२०० ग्रॅम सुरती पापडी.
१ वाटी प्रत्येकी हिरवे तुरीचे दाणे ,मटार दाणे.
६ अगदी लहान वांगी.
१ वाटीभर फ्लॉवर चे तुकडे.
८ अगदी लहान गोल बटाटे.
१ लिंबू,
मुठिया साठी-
१ जुडी मेथीची पाने.
१ १/२ वाटी जाडसर बेसन.
१/२ वाटी जाड कणिक.
[नेहमीचे बेसन , कणिक व जाड रवा घेतला तरीही मुठिये छान होतात.]
अर्धी वाटी तीळ.
चवीप्रमाणे तिखट,मीठ,हिंग,जिरे,मोहोरी,हळद,मेथीदाणा,कढीपत्ता ७-८ पाने.
१ टेबलस्पून ओवा,
१ टी स्पून हिंग पूड,
२ टेबलस्पून बडीशोप्,[यातली अर्धी भरडुन मुठियात घालायची आहे.]
१टेबलस्पून जिरे पुड.
२ टेबलस्पून धनेपुड,
१ टेबलस्पून गूळ.
२ टेबलस्पून गरम मसाला.
१ हिरव्या लसणीची पातीची जुडी.
थोडीशी हिरव्या कांद्याची पात ,
१ हिरवी मिरची.
१ कोथिंबीरीची जुडी.
१ १/२ वाटीभरुन तेल.[दिड वाटी]
२ टेबलस्पून मोहनासाठी तेल.
क्रमवार पाककृती:
१]सुरण ,कंद,कच्ची केळी साले काढुन मोठ्या फोडी करुन घ्याव्या.सुरण फोडी भिजतील इतके पाणी घालुन गॅसवर अर्धवट उकडुन घ्याव्या.उकडले कि त्यातील पाणी काढुन टाकावे.असे सुरण खाजरे लागत नाही.
फ्लॉवर चे मोठे तुकडे करुन गरम पाण्यात चिमुटभर मिठ घालुन त्यात टाकावे.फोडणीच्या वेळेस यातील पाणी फेकुन द्यावे.फ्लॉवरचा उग्रपणा पाण्यातुन निघुन जातो.
कंद व केळी च्या फोडी थोड्या पाण्यात टाकुन ठेवाव्या.म्हणजे त्या काळ्या होणार नाहीत.
२]सुरती पापडी च्या रेषा सोलुन घ्याव्या.
३]बटाटे पाण्यातुन छान धुवुन घ्यावे.मातीचा अंश पूर्ण पणे गेला पाहिजे.
४]अर्धी लसूण पात,अर्धी जुडी कोथिंबीर,अर्ध्या लिंबाचा रस ,१ टेबलस्पून तीळ,हिरवी मिरची,जिरे व चवीपुरते मीठ व थोडेसे पाणी घालुन हिरवी घट्टसर चटणी वाटुन घ्यावी.
वांगी व बटाटे यांना सुरीने उभे काप काप द्यावे.
वांगी ,बटाटे,सुरण्,कंद,केळी,फ्लॉवर च्या फोडी पाण्यातुन काढुन्,कापडावर त्यातले पाणी टिपुन घ्यावे.या सर्व फोडींवर वाटलेली अर्धी चटणी लावुन घ्यावी.म्हणजे फोडीत मसाला मुरेल.
मेथीची भाजी चिरुन घ्यावी त्यात बेसन,कणिक,तिखट,मीठ,थोडासा हिंग,हळद,थोडासा ओवा व बडीशोप,१ चमचा तीळ मीठ व पाणी घालुन घट्टसर भिजवुन घ्यावे.
लहान कढईत तेल गरम करावे .गरम तेलाचे मोहन या भिजवलेल्या पिठात घालुन कालवावे व लहान लहान गोल आकाराचे मुठिये खरपुस तळुन घ्यावे.
आता जड बुडाच्या पॅन मधे उरलेल्यातेलाचीफोडणीकरायचीमोहोरी,मेथीदाणा,ओवा,जिरे,हिंग,कढीपत्ता,मेथीदाणा.बडीशोप,कोथिंबीर घालुन त्यात चिरलेली लसुण पात,कांदा पात,उरलेली अर्धी कोथिंबीर, सुरती पापडी,तूर्-मटर दाणे-शेंगदाणे आणि हिरवा मसाला लावलेल्या सर्व भाजीच्या फोडी घालुन परताव्या.तिखट,मीठ,उरलेली चटणी,,जिरेपुड,उरलेल्या अर्ध्या लिंबाचा रस ,गरम मसाला ,धनेपुड,गूळ घालुन मिश्रण छान ढवळुन घ्यावे.
साधारण वाटीभर गरम पाणी घालावे. गॅसच्या दुसर्या शेगडीवर एक तवा तापवुन घ्यावा.तवा गरम झाला कि गॅस अगदी कमी करुन त्यावर पॅन ठेवावे वर झाकण ठेवुन मंद आचेवर शिजु द्यावे.अधुन मधुन वाफ आली कि परतावे.बटाते शिजले कि त्यात तळलेले मुठीये घालुन पुन्हा एकदा परतावे व एक वाफ आणावी.
आता उंधियु तयार आहे.वाढताना त्यावर डाळिंबाचे दाणे,द्राक्ष टाकावे.
ML/ML/PGB
20 May 2024