आता महात्मा फुले योजनेत पाच लाखांचे उपचार

 आता महात्मा फुले योजनेत पाच लाखांचे उपचार

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत असलेली उपचारांची सध्याची दीड लाख रुपये खर्चाची मर्यादा पाच लाख रुपये करण्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली, याबाबतची लक्षवेधी सूचना राहूल पाटील यांनी उपस्थित केली होती.

या योजनेत आयुर्वेदिक उपचारांचा समावेश करण्यासाठी अभ्यास समिती नेमली जाईल त्यांचा अहवाल तीन महिन्यांत मागवला जाईल आणि मग त्यावर निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

उप अभियंता निलंबित

जळगाव जिल्ह्यातील पारोळा उपविभागात जलसंधारण कामांमध्ये झालेल्या घोटाळ्यात प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या उपअभियंत्याचं निलंबन करण्याची घोषणा प्रभारी मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली, यासाठी विरोधकांनी जोरदार मागणी केली होती त्यासोबतच पिठासीन अधिकाऱ्यांनीही तशी सूचना केली होती.

या कामांसाठी तक्रारी आल्यावर चौकशी समिती नेमली गेली त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे, त्यात कार्यकारी अभियंता आणि उप अभियंता यांना प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेले आहेत. त्यांची अधिक चौकशी अतिरिक्त विभागीय आयुक्त यांच्यामार्फत करून पुढील कारवाई केली जाईल असं मंत्री म्हणाले, अनिल पाटील आणि इतर विरोधी सदस्य यासाठी आक्रमक झाले होते, कार्यकारी अभियंता निवृत्त झाले आहेत.

आदिवासी विद्यार्थ्यांना वाढीव रक्कम

आदिवासी समाजातील PhD करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी १०० जागा उपलब्ध असून त्यासाठी ३१ मार्च पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे, सध्या असलेली अनुदानाची रक्कम पंचवीस हजारवरून ३१ हजार रुपये इतकी केली जाईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी यावरच्या लक्षवेधी सूचनेवर दिली.

आदिवासी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी धोरण लवकरच तयार केलं जाईल असं ही मंत्री म्हणाले, सुरेश वरपुडकर , देवराव होळी , रोहित पवार यांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते.

खावटी कर्ज वेळेवर देण्याचा प्रयत्न केला जाईल , वनोपज उत्पादन वाढवून आदिवासींचे स्थलांतर थांबवले जाईल असं ही मंत्री म्हणाले , धर्मरावबाबा अत्राम यांच्या लक्ष वेधी वर मंत्र्यांनी हे उत्तर दिलं.

ML/KA/SL

9 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *