किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी आता ही अट
नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमुळे देशातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थीना १४ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. विशेष म्हणजे लाभार्थींना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावात पोस्टामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ संबंधित लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
राज्यात सद्यःस्थितीत १२ लाख ९१ हजार लाभार्थीची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात १४ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. यासाठी लाभार्थीनी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडावे. हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासांत जोडले जाईल.
आयपीपीबी’मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थीना अन्यत्र जाण्याची गरजही पडणार नाही.
SL/KA/SL
5 May 2023