आता आधारकार्ड जवळ बाळगण्याची गरज नाही

 आता आधारकार्ड जवळ बाळगण्याची गरज नाही

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दैनंदिन व्यवहारात सर्वांत आवश्यक कागदपत्र असलेले आधारकार्ड अधिक अद्ययावत करण्यासाठी आता नवीन App लाँच करण्यात आले आहे. यामुळे आधारकार्ड सोबत बाळगण्याची गरज राहणार नाही.

यामध्ये फेस आयडी म्हणजेच चेहऱ्याची ओळख पटवण्याची सुविधा आहे. या नवीन सुविधेमुळे देशभरात डिजिटल ओळखीची प्रक्रिया सोपी, सुरक्षित आणि कागदविरहित होईल.

आता कोणत्याही सरकारी सेवेसाठी, सिम कार्ड खरेदीसाठी किंवा बँकिंगशी संबंधित प्रक्रियेसाठी, फक्त चेहरा स्कॅन करून ओळख पटवणे शक्य होणार आहे. म्हणजेच ओटीपी, फिंगरप्रिंट किंवा डोळ्यांचे स्कॅनिंग करण्याची आवश्यकता राहणार नाही.

नोंदणीच्या वेळी ॲप वापरकर्त्याचा लाईव्ह सेल्फी घेते. लाईव्ह सेल्फी मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्यातून घेतला जातो. यानंतर आधार डेटाबेसशी हा फोटो जुळवून ओळखीची पुष्टी केली जाते. हे तंत्रज्ञान सुरक्षा नियमांचे पालन करते आणि ओळख फसवणूक रोखण्यास मदत करेल. हे वैशिष्ट्य अधिक उपयुक्त ठरू शकते, विशेषतः देशाच्या दक्षिणेकडील भागात, जिथे फिंगरप्रिंटद्वारे ओळखण्यात अडचण येते.

आता आधार पडताळणीसाठी कार्डची हार्ड कॉपी किंवा त्याची छायाप्रत आवश्यक नाही. या ॲपमध्ये डिजिटल आधार कार्डचा पर्याय आहे जो क्यूआर कोडद्वारे त्वरित ओळख पटविण्यास अनुमती देतो. यामुळे कागदपत्रांचा त्रास कमी होईल आणि डेटा सुरक्षितता देखील राहील

SL/ML/SL12 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *